जिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न

0
1385

पालघर, दि. 4 एप्रिल: जिल्ह्यातून आज 4 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 15 झाली आहे. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आज निष्पन्न झालेल्या 4 रुग्णांपैकी 3 जण हे वसई ग्रामीण भागातील राजोडी येथील असून परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. अन्य 1 जण नालासोपारा येथील परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नसलेला रुग्ण आहे.

105 तपासणी अहवाल निगेटिव्ह: एकूण 226 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 105 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 106 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

होम क्वारन्टाईन चा भंग करणाऱ्या 106 लोकांना सक्तीचे क्वारन्टाईन: वसई तालुक्यात होम क्वारन्टाईन केलेल्या 106 जणांनी आदेश न पाळल्यामुळे त्यांना सक्तीने इंस्टीट्यूशनल क्वारन्टाईन करण्यात आले. 53 जणांना हॉटेल रॉयल गार्डन, 26 जणांना हॉटेल सुवी पॅलेस, 26 जणांना हॉटेल रुद्र शेल्टर, व एकास हॉटेल लेक सिटी येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

सध्या 14 रुग्ण पुढीलप्रमाणे दाखल आहेत. कस्तुरबा रुग्णालय (मुंबई) – 3; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 1; जसलोक (मुंबई) – 1; एमजीआरएम (पवई) – 3; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1; बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 4; डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA