डहाणू : 16 जुगारींना अटक

0
2385
80 हजारांची रोख रक्कम जप्त

राजतंत्र मीडिया/डहाणू, दि. 17 : डहाणू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खाजगी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांना गणेशोस्तव सुरु होण्यापूर्वी पोलीसांनी जुगार तसेच कोणत्याही प्रकारची अवैध कृत्य करू नये, अशी सूचना देऊनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची तक्रार पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण व डहाणू पोलीसांनी संयुक्तरित्या कारवाई करत काल, मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास सावटा तलावपाडा येथे छापा टाकून 16 जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी तसेच पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या पथकाने साफळा रचून ही कारवाई केली.