भिवंडीतून आलेले 8 जण क्वारन्टाईन! परिसरातील लोक चिंतेत! दिल्ली कनेक्शन नसल्याचा प्रशासनाचा निर्वाळा!

0
2476

जव्हार, दि. 3: जव्हार मध्ये 8 जण भिवंडी येथून आले असून त्यांना शहराच्या मध्यवस्तीतील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 8 जणांमध्ये 9 व 16 वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. ह्या संशयीतांचा दिल्लीच्या मरकज कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे जव्हारचे प्रांताधिकारी प्रजीत नायर यांनी सांगितले आहे.

हे 8 जण भिवंडी मार्गे जव्हारला परतले आहेत. कोरोना विषयी लोकांमध्ये भय पसरले असल्यामुळे लोकांचा मध्य वस्तीतील वसतीगृह क्वारन्टाईन करण्यासाठी वापरण्यास आक्षेप आहे. या सर्वांच्या घशाचे नमुने मुंबईतील जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामदास मराड यांनी दिली आहे. 

लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक ॲड. प्रसन्ना भोईर यांनी सर्व क्वारन्टाईन व्यक्तींना जव्हार शहराबाहेरील भारती विद्यापीठाची इमारत अथवा नगरपरिषदेच्या सनसेट रिसॉर्ट मध्ये हलविण्याची मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजित नायर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्या कडे केली आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे जव्हारकरांचे लक्ष लागले आहे.

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA