पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची आकडेवारी (28.03.2020 रोजीची) आशादायक

0
1873

दि. 28 मार्च (संजीव जोशी): पालघर जिल्ह्यामध्ये आज रोजी (28 मार्च) परदेशात प्रवास केलेल्या 625 व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यामध्ये 25 जण हे 60 वर्षे पेक्षा जास्त वयाचे आहेत. देखरेखीखालील प्रवाश्यांपैकी 232 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.
37 प्रवाश्यांमध्ये कोरोनाबाधेची लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्यातील 25 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 23 अहवाल निगेटिव्ह आले असून 2 अहवाल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत.

• डहाणू: तालुक्यात 36 जण देखरेखीखाली असून त्यातील 3 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 19 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
 • पालघर: तालुक्यात 99 जण देखरेखीखाली असून त्यातील 10 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 43 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 11 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, 8 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. 3 रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे.
 • वाडा: तालुक्यात 21 जण देखरेखीखाली असून त्यातील 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 1 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
 • जव्हार: तालुक्यात 1 जण देखरेखीखाली होता. त्याचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
 • मोखाडा: एकही व्यक्ती देखरेखीखाली नाही.
 • विक्रमगड: तालुक्यात 3 जण देखरेखीखाली होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
 • वसई: शहरीकरण झालेल्या या तालुक्यात 469 जण देखरेखीखाली असून मागील 3 दिवासांत ही संख्या 69 ने वाढली आहे. त्यातील 12 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. त्यातील 151 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 15 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, त्यापैकी 6 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 2 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या निकट संपर्कात आलेल्या 6 व्यकींचे विलगीकरण करुन त्यांच्या घशाचे नमुने घेतले असता, त्यातील 4 नमुने निगेटिव्ह असून 2 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.

आमच्या लेखणीला बळ द्या!
300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! आमच्या वाचक क्लबचे सदस्य व्हा! त्यासाठी खालील ▪ Link ला Click करा!
https://imjo.in/vq7QpV

कृपया अधिकृत संकेतस्थळावरील बातम्या किंवा खात्री केलेल्या बातम्याच forward करा! काही लोक अधिकृत मॅसेजेस Edit करुन forward करतात. असे मॅसेजेस आपण चांगल्या हेतूने forward करतो. पण त्यातून चुकीची माहिती व अफवा पसरवली जाऊ शकते व आपण अडचणीत सापडू शकतो. सुरक्षित व अफवामुक्त रहा!

या क्षणाला (दिनांक: 28 मार्च 2020; सकाळी 10 वाजता) सरकारी संकेतस्थळावरील माहिती अशी आहे.
देशभरातील विमानतळांवर एकूण 15,24,266 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. एकूण 775 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 78 जण पूर्णत: बरे झाले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 177 झाली असून त्यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 25 जण पूर्णत: बरे झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
नजीकच्या गुजरात राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 झाली असून 3 जणाचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA