
दि. 23 जून : डहाणू तालुक्यातील वाढवण गावच्या एका 53 वर्षीय इसमाचा कोरोनाबाधेमुळे मृत्यू ओढवला आहे. ह्या व्यक्तीवर डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज रात्री उशीरा मृतावर डहाणूतील मल्याण स्मशानभूमीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ह्या घटनेमुळे वाढवण गाव प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. मृत व्यक्ती बोईसरमध्ये रहात होती व 2/3 दिवसांपूर्वी वाढवण येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान वरोर मांगेलआळी येथे एक व्यक्ती कोरोना +Ve निघाल्यामुळे हा परिसर देखील प्रतिबंधीत केला आहे.

