जिल्ह्यात आज कोरोना मृत्यू 4! मृत्यूंचा एकूण आकडा 105! नवे +Ve 199!

0
2189
Nidhie Infra Builds Square Shape

दि. 23 जून 2020: आज वसई महानगरामध्ये कोरोनाच्या संसर्गाने 4 मृत्यू झाले असून वसई तालुक्यातील मृतांची संख्या 99 झाली आहे. पालघर तालुका 4, वाडा व विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 मृत्यू झालेले असल्याने पालघर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 105 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यामध्ये आज नव्या 199 कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून, त्यातील विक्रमगड तालुक्यातून 15, जव्हार तालुक्यातून 12, वाडा तालुक्यातून 7, डहाणू तालुक्यातून 3, मोखाडा तालुक्यातून 2, पालघर तालुक्यातून 1 रुग्ण वाढले आहेत. उर्वरीत 159 पॉझिटीव्ह वसई तालुक्यातील आहेत.