mahanews MEDIA
डहाणू दि. ७: ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक पद्मश्री नटवरभाई ठक्कर यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात नागा ख्रिश्चन पत्नी पद्मश्री लेंटीना, २ मुली व १ मुलगा आहे. ते डहाणूचे सुपुत्र असून स्वर्गीय जसाभाई ठक्कर (दवावाले) यांचे सख्खे भाऊ तथा लॉयन्स क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष जिग्नेश ठक्कर यांचे काका होत.
नटवरभाई यांचा जन्म १९३२ मध्ये डहाणू येथे झाला होता. त्यांचे शिक्षण डहाणूतील के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये झाले होते. महात्मा गांधीजींच्या विचाराने ते भारावून गेले होते. त्यांचा वारसा चालविणाऱ्या काकासाहेब कालेलकर यांच्यापासून प्रेरणा घेत वयाच्या २३ व्या वर्षी भारताशी पूर्वोत्तर राज्यांना प्रेमाने जोडण्याच्या जिद्दीने डहाणू सोडून नागालँड येथे गेले. तेथे त्यांनी १९५५ मध्ये नागालँड गांधी आश्रम स्थापन केला.
नटवरभाई यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही महत्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे :
- जमनालाल बजाज ॲवार्ड (१९८७)
- इंदीरा गांधी राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार (१९९४)
- मेघालय सरकारचा महात्मा गांधी पुरस्कार (१९९६)
- भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (१९९९)
- नागा लोकांनी दिलेला जीवन गौरव पुरस्कार (२००९)
- माय होम इंडीयाचा कर्मयोगी पुरस्कार (२०१५)
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!
