mahanews MEDIA
पालघर, दि. ७: पालघर जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या माकुणसार स्पोर्टस् फाॅऊंडेशन च्या वतीने आज (रविवार, ७ ऑक्टोबर) पालघर तालुक्यातील माकुणसार येथे आयोजीत करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत विक्रमगड, वाडा आणि जव्हार या ग्रामीण भागातील खेळाडूंचा विशेष दबदबा दिसून आला. ग्रामीण भागात मॅरेथॉन धावपटू घडवणे हे उद्दिष्ट ठेवून तसेच “पर्यावरण संरक्षण” आणि “स्वच्छ गाव! स्वच्छ भारत!” हा संदेश देण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन आणि फ्लॅग ऑफ केळवे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभासाठी मुंबई क्रिकेट अससोसिएशनचे पंकज ठाकूर, बोईसरचे आमदार विलास तरे, नाबार्डचे जनरल मॅनेजर विलास सावे, पालघर पंचायत समितीच्या सभापती मानिषा पिंपळे, महाराष्ट्र स्पोर्टस् अॅकॅडमीचे अध्यक्ष संजय पाटील, उद्योजक लक्ष्मण कोलते, केळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना किणी हे मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने माकुणसारचे सुपुत्र नाट्यलेखक, दिग्दर्शक अनिकेत पाटील, दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या सह्याद्री मित्र परिवार या संस्थेचे आणि एम टेक जीओमँटीक्स केलेले पराग शिंदे आदींचा सन्मान करण्यात आला. माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशनचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी सुयोग्य नियोजन करुन स्पर्धा यशस्वी केली.
स्पर्धा चार गटात विभागण्यात आली होती. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:-
- ११ कि.मी. पुरुष गटात ज्ञानेश्वर मोरगा याने प्रथम, अमित माळी याने द्वितीय, तर शैलेश गंगोडा याने तृतीय क्रमांक पटकावला.
- ११ कि.मी. महिला गटात जयश्री नारायण हीने प्रथम, प्रमिला पाटील हीने द्वितीय, तर दीक्षा उगले हीने तृतीय क्रमांक पटकावला.
- ५ कि.मी. पुरुष गटात विलेश अंबात याने प्रथम, सुनील सहानी याने द्वितीय, तर दिपेश चौधरी याने तृतीय क्रमांक पटकावला.
- ५ कि.मी. महिला गटात अपूर्वा गोरे हीने प्रथम, जान्हवी शेलार हीने द्वितीय, तर जान्हवी हेमाडे हीने तृतीय क्रमांक पटकावला.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!
