
राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 19 : सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. 9 नोव्हेंबर 2013 रोजी येथील सुतारपाडा भागात ही घटना घडली होती

आरोपीने शेजारी राहणार्या पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बोईसर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पाटील यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपीविरोधात सबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असुन शिक्षेनंतर त्याची ठाणे येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.