राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. ६ : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागावाच्या महिला व सबलीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उदेशाने विशेष योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्ती जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे महिला व बाल कल्याण सभापती धनश्री चौधरी यांनी केले आहे.
महिला सबबीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या सन सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पा नुसार ३ कोटी ६१ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंतर्गत तलासरी, जव्हार, जव्हार २, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, कासा, वाडा १, वाडा २, पालघर, मनोर, वसई १ वसई २ या प्रकल्पात अनेक अर्थ सह्याच्या योजना राबविण्यात येत आहेत. यात शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे, ७ वी ते १२ पास मुलींना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षण देणे, महिलांकरिता मराठी/ इंग्रजी टायपिंग प्रशिक्षण अनुदान देणे, स्वंयरोजगार चालना देण्यासाठी वाहन चालक प्रशिक्षण व परवाना शुल्क अनुदान, परिचारिका प्रशिक्षण, नकली दागिने बविण्याचे प्रशिक्षण देणे, ब्युटीपार्लर प्रशिक्षण अनुदान देणे, इयता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी विशेष गुणवत्ता धारक अनुसूचित जातीच्या( एससी) मुलींना पुढील शिक्षणासाठी अर्थसह्या करणे आदी योजनांचा समावेश आहे.
ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील दारिद्र्य रेशेखालीली तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन रु. ५० हजार रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबातील महिलांना व मुलींना या योजनांचा प्रथम लाभ देण्यात येईल. तद्नंतर सर्वसाधारण लाभार्थींना देण्यात येईल. लाभार्थींची अंतिम निवड करण्याचे अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहील. अशी माहिती देतानाच या योजनांबाबत अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अन्यथा ०२५२५२५७७५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) नंदकिशोर जेजुरीकर यांनी केले आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी मुख्यसेविकां कडे आपले अर्ज जमा करावे. मुख्य सेविका सदर अर्ज प्रकल्प कार्यालयास सादर करतील मग प्रकल्प कार्यलय त्यांना नेमून दिलेल्या लक्षांका प्रमाणे अर्ज एकत्र करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवले जातील. तसेच पेसा क्षेत्रातील लाभार्थ्याचे अर्ज ग्रामसभेच्या मान्यतेने सादर कराण्यात यावेत. असे जिल्हा परिषदेमार्फत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.