डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे निधन

0
5197

डहाणू दि. 29 मार्च: डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले आहे. ते 39 वर्षांचे होते. 26 मार्च रोजी पिंपळे हे डहाणूतील निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात अत्यवस्थ स्थितीत आढळले होते. त्यांच्यावर वेस्ट कोर्स रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारांसाठी मिरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार चालू असताना काल रात्री हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांची किडनी व यकृत क्षतिग्रस्त झाले. त्यानंतर पिंपळेना हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कृषि क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केले व स्पर्धा परीक्षेत यश मिळवून नगरविकास विभागातील मुख्याधिकारी संवर्गातील नोकरी मिळवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी, विधवा आई असा परिवार आहे. अलीकडे ते सतत तणावाखाली असायचे. त्यांची प्रकृती वेळोवेळी बिघडत असल्याने ते बऱ्याचदा आजारपणाच्या सुट्टीवर जात असत. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.