वार्ताहर/बोईसर, दि. 25 : सत्तेवर येताच पुढील 90 दिवसात भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारसीनुसार देशभरातील ईपीएस-95 निवृत्त कर्मचार्यांना किमान तीन हजार रुपये अधिक महागाई भत्ता लागू करु, असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपले आश्वासन न पाळल्याने निषेध म्हणून पालघर जिल्ह्यातील निवृत्त कर्मचारी येत्या 25 फेबु्रवारी रोजी खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करणार आहेत.
देशभरातील 65 लाख पेन्शनधारक व दोन कोटी कार्यरत सभासदांनी गेल्या पाच वर्षात वारंवार मोर्चे, धरणे, निवेदनांच्या माध्यमातून कोशियारी समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. मात्र वारंवार आश्वासनापलीकडे काहीच पदरी पडले नाही. आजच्या महागाईच्या काळात एक हजार वा त्यापेक्षाही कमी पेन्शन मिळणार्या पेन्शनधारकांसमोर आता आत्महत्येचाच प्रसंग ओढावणार आहे. त्यामुळे केवळ सत्ता प्राप्तीसाठी अनेक आश्वासनं देऊन ज्येष्ठांची क्रूर चेष्टा केल्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलनाचा वणवा पेटत असुन पालघर जिल्ह्यातील निवृत्त कर्मचारी येत्या 25 फेब्रवारीला खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करणार असल्याचे निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल तरहाबदकर यांनी सांगितले.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा