असोसिएटेड कॅप्सुलचे जिलेटीनयुक्त पाणी आदिवासींच्या शेतात

0
4183

डहाणू, दि. 14 जुलै: तालुक्यातील आशागड येथील असोसिएटेड कॅप्सुल (ACG) कंपनीच्या जिलेटीनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे वारंवार उघड होत आहे. ह्या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे परिसरातील विहिरी आधीच प्रदूषित झालेल्या असताना आता शेतात साठणारे पाणी देखील रंगीत दिसू लागले आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून कॅप्सूल मध्ये वापरले जाणारे जिलेटीन व रंग हे खाण्यायोग्य असल्यामुळे त्यापासून निघणारे सांडपाणी अपायकारक असल्याचा दावा केला जातो. आताच सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रीया होत नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीच्या विस्ताराला (झीरो डिस्चार्ज तत्वावर) परवानगी दिलेली आहे. परिसरातील आदिवासींच्या प्रश्नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

7 July 2019