असोसिएटेड कॅप्सुलचा व्यवस्थापन सदस्य +Ve

0
6485

दि. 14 जुलै: डहाणू तालुक्यातील असोसिएटेड कॅप्सुल ही अत्यावश्यक सेवा ह्या सदरातील कंपनी असल्याने ती लॉकडाऊन काळातही चालू राहिली. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार कामावर येत नसल्याने कंत्राटी कामगारांच्या जोरावर कामकाज चालवण्यात आले. त्यातच कंपनीचे विस्तारीकरणाचे काम सुरु असल्याने मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर कंपनीच्या आवारात राहिले होते. काही कामगार वसईतील हॉटस्पॉटमधून ये जा करीत होते. आता, कंपनीच्या स्थलांतरित मजूरांपैकी किमान 11 जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून 90 पेक्षा जास्त लोकांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. या आधीच डहाणू शहरातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे निवास असलेल्या इमारतीला प्रतिबंधीत करण्यात आले होते. काल (13 जुलै) रात्री डहाणू मल्याण येथील एका व्यवस्थापन सदस्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या शिवाय कंपनीच्या कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण झाली असल्यास त्याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.