पालघर, दि. 16 जून: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 47 नवे कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये एकट्या वाडा तालुक्यातील 27 व जव्हार तालुक्यातील 14 जणांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यात 2 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून विक्रमगड येथे 1 व डहाणू तालुक्यात (वाणगांव) 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
