दि. 16 जून: जव्हार शहरातील 12 व्यक्तींना व वाडा येथील अटकेतील 11 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पालघर तालुक्यातील बोईसर परिसरातील 2 जणांना बाधा झाली आहे. डहाणू शहरातील (फोर्ट) एका बॅन्क कर्मचाऱ्याचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे.
जिल्ह्यातील मृतांची संख्या 68
पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील मृतांची संख्या 60 झाली असून वसई ग्रामीण क्षेत्रातील 5 मृत्यूंसह एकट्या वसई तालुक्यात कोरोना बाधीत मृतांचा आकडा 65 झाला आहे. पालघर तालुक्यात 3 मृत्यू झाले आहेत.