पालघर, दि. 15 जून: ” पालघर जिल्हा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश ” अशी हेडलाईन एका वृत्तवाहिनीवर झळकल्याचा मॅसेज सोशल मिडीयावरुन प्रसारित होत आहे. तथापि हा फेक मॅसेज असून कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. वृत्तवाहिनीच्या बॅनरचा गैरवापर करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई करावी, तसेच संबंधित वृत्तवाहिनीने देखील तक्रार नोंदवावी असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.
