लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताचा आदर आणि अल्पमताची कदर करणे आवश्यक! -संजीव जोशी

0
2192

BHARTIY SAVIDHANराजतंत्र न्यूज नेटवर्क/दि. 26 : लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताचा आदर करण्याबरोबरच अल्पमताची देखील कदर करणे आवश्यक ठरते. भारतीय संविधान समजून घेतल्याशिवाय आपल्याला लोकशाही समजणार नाही. लोकशाही व्यवस्था समजून घेतल्यास तुमच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल आणि देशाला महासत्ता बनविण्याचे आव्हान तुम्ही पेलू शकाल, असा मंत्र दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी आज (29 जानेवारी) चिंचणी (डहाणू) येथील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयात बोलताना दिला. ते महाविद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातर्फे 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान लोकशाही संवर्धन पंधरवडा साजरा केला जात असून या कालावधीमध्ये जनजागृती रॅली, पथनाट्ये, निबंध स्पर्धा, व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज संजीव जोशी यांचे लोकशाही या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना जोशी यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत, प्राध्यापक डॉ. जे. के. पाटील व डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कामत उपस्थित होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा