>> नशेसाठी होत होती औषधाची विक्री?
वार्ताहर/बोईसर, दि. 29 : येथील मंगलम बिल्डींगमध्ये विनापरवाना औषधाची विक्री होत असलेल्या एका फ्लॅटवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन 1 लाख 15 हजार रुपयांचा साठा जप्त केला असुन नशेसाठी या औषधाची विक्री होत असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
बोईसर रेल्वे स्टेशनजवळील मंगलम इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये नशा होेणार्या एका औषधाची विक्री होत असल्याची गुप्त बातमी बोईसर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी या फ्लॅवर छापा टाकला असता तेथे 1 लाख 15 हजार 200 रुपये किंमतीच्या CROX नावाच्या नऊशे सिरपच्या बॉटल्या आढळून आल्या. या औषधामध्ये कंडेन फॉस्फेट हा गुंगीकारक व नशा येणारा घटक असुन या सिरपचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मनुष्याला नशा येत असल्याचे ड्रग्स औषध निरीक्षकांनी सांगितले. त्यामुळे नशेसाठी या औषधाची विक्री होत असावी असा संशय व्यक्त होत आहे. विनापरवाना औषध साठा बाळगणे हा औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 140 चे कलम 18 नुसार गुन्हा आहे. त्यानुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन जप्त औषधाची चाचणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती ड्रग्स औषध निरीक्षक श्याम सुंदर प्रतापराव यांनी दिली.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा