डहाणूतील रक्तपेढी एक पाऊल पुढे; नालासोपारा येथे अद्ययावत रक्तपेढी सुरु!

0
2770
SATHIYA RAKTPEDHImahanews Media/डहाणू दि. २८: येथील साथिया ट्रस्ट संचलित डी. के. छेडा रक्तपेढीच्या डहाणूतील १५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता नालासोपारा येथे अद्ययावत रक्तपेढी सुरु करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार क्षितिज ठाकूर, साथियाचे चेअरमन विजय महाजन, स्नेहांजली शोरुम्सचे मॅनेजिंग डायरेक्ट कनैयालाल मुलचंदानी, डी. के. छेडा रक्तपेढीचे संचालक महेशभाई छेडा, लॅबटोपचे सर्वेसर्वा बैजू जॉर्ज उपस्थित होते.
साथीया ट्रस्टने डहाणूसारख्या भागात १५ वर्षांपूर्वी रक्तपेढी सुरु केली व लोकांना समाधानकारक सेवा दिल्याबद्दल आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विजय महाजन व त्यांच्या टीमचे कौतुक केले. तसेच अशा समाजसेवी प्रकल्पांना सढळ हस्ते साहाय्य करणाऱ्या स्नेहांजलीच्या मुलचंदानी व लॅबटॉपच्या बैजू जॉर्ज यांचे अभिनंदन केले. या रक्तपेढीद्वारे २४ तास सेवा पुरवली जाणार असून पैशासाठी कोणीही परत जाणार नाही अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.
नालासोपारा पूर्व बाजूस रेल्वेस्टेशनच्या नजीक स्नेहांजली शोरुम्सच्या मागील बाजूस ही रक्तपेढी असून मुलचंदानी यांनी माफक दरात येथे मोक्याची जागा उपलब्ध करुन दिली आहे. रक्तपेढीसाठी आवश्यक उपकरणांचे निर्माते लॅबटॉप तर्फे सर्व अद्ययावत अशी यंत्रसामुग्री या प्रकल्पासाठी पुरवली आहे. येथे रक्तदात्याच्या रक्तातून प्लेटलेट्स गोळा करुन तेच रक्त पुन्हा रक्तदात्याच्या शरिरात सोडण्याची व्यवस्था देखील आहे.
[divider]
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!