
राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. २०: आज सकाळपासून डहाणूला भूकंपाचे 3 धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 10.14 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, दुसरा धक्का दुपारी 1.24 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, तर तिसरा धक्का दुपारी 1.29 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा होता. या तीनही भूकंपांचे केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोल असून यातील पहिला व तिसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 20° तर रेखांश 72.8° वर आणि दुसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 20° व रेखांश 72.7° वर होता. पहिल्या व दुसऱ्या भूकंपाच्या केंद्रबिंदूंमध्ये अंदाजे 11 किलोमीटरचे अंतर होते.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा