डहाणूत जुगाराचे अड्डे उद्धवस्त; 23 जुगारी अटकेत, दोघे फरार

0
2044

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 1 : डहाणूतील विविध भागात सुरु असलेले जुगाराचे दोन अड्डे डहाणू पोलीस व पालघर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई करत उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईतून एकुण 23 जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण फरार झाले आहे आहेत. तसेच या जुगार्‍यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जितेंद्र विजय दुबळा (वय 45) याच्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पालघर स्थानिक गुन्हे शाखेने 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास छापा टाकत जितेंद्र दुबळासह रविंद्र लडकू दुबळा, सलीम गुलाम शेख, सुनील अमरनाथ गुप्ता, संजय भानु पांडे, रमेश बाबू धोडी, नवल गुरगीन अंधेर, नरेश किसन पवार, समशेर लतीफ अन्सारी, कमलेश रामकृष्ण चव्हाण, गुड्डू श्रीकृष्ण भारव्दाज, निलेश नारायण माच्छी, शेखर इंद्रवबहादूर सिंग, सचिन ऊर्फ सनी जिवा पटेल, अशा 14 जणांना तसेच हा जुगाराचा अड्डा चालवणार्‍या आरोपीला अटक केली आहे.

तर डहाणू पोलिसांनी काल, 31 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 च्या सुमारास कंक्राडी डोंगरीपाडा येथील रस्त्याच्या बाजुला टेम्पररी शेडमध्ये रमी नावाचा जुगार खेळणार्‍या रमेश सोन्या बुंधाडा, संदिप गमणभाई पटेल, यशवंत विठ्ठल दळवी, दिपक लखु माच्छी, नरेश माहद्या वाडु, विजय महादु दसवत, देवल्या शालु खाच्या, जतीन अजय शिंदे, लखमा गोपाळ कडु अशा 9 जणांना अटक केली आहे. तर प्रजोत शिंदे व जयवंत वाडु हे दोघे अंधाराचा फायदा घेत निसटण्यात यशस्वी झाले. या जुगार्‍यांकडून पोलिसांनी 2 लाख 10 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन फरार जुगार्‍यांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व जुगार्‍यांविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.