डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट, मिहीर शहा भाजपात

0
2957

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविलेले विद्यमान स्वीकृत सदस्य मिहीर शहा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आमदार आनंद ठाकूर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रवेश कार्यक्रमात ठाकूर यांचा मुलगा करण उपस्थित असल्याने आनंद ठाकूर यांचा केवळ मुहूर्त बाकी असल्याचे संकेत आहेत.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश पार पडला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र माच्छी, भावेश देसाई, शमी पिरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या पक्षांतराच्या चर्चा सुरु होत्या. त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.