
माझ्या कॅफेसमोर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव झालेला असून ही कुत्री कॅफेमध्ये घुसतात. त्यांच्यापासून गिऱ्हाईकांना देखील त्रास व भिती वाटते. याबाबत मी डहाणू नगरपालिकेकडे देखील तक्रार केलेली आहे. प्राणी मित्रांकडे देखील कैफियत मांडली आहे. डहाणू नगरपालिका आणि प्राणी मित्र अशा दोघांनी हात वर केले आहेत. मला स्वसंरक्षणासाठी एक दांडूका ठेवावा लागतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत असलेल्या कुत्र्याला रॅबीज झाला असावा अशी मला शंका आल्याने मी त्याला तिथून हाकलले आहे. मी कुत्र्याला मारायला नको होते हे खरे आहे, पण मला होत असलेल्या त्रासातून हे घडले आहे. मी क्रूर नाही. प्राणी मित्रांनी माझी समस्या समजून घ्यावी.” प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट ” प्रमाणे विशालवर काय कारवाई होऊ शकते?
- प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट,1960 मधील कलम 11(1)(A) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो व अशा पहिल्या गुन्ह्यासाठी विशालला 25 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. अर्थात गुन्हा अदखलपात्र असल्याने त्यासाठी न्यायालयात तक्रार दाखल करावी लागणार आहे.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!