
डहाणू, दि. 26 : डहाणू नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. हा कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत होता व कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेमलेल्या पथकात कार्यरत होता. 16 जून पासून ह्या कर्मचाऱ्याला ताप आल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. 24 जून रोजी पुन्हा त्याला ताप आल्यानंतर त्याला डहाणू उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केली असता अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. डहाणू नगरपरिषदेचे कार्यालय असलेल्या इमारतीचे आता निर्जंतुकीकरण करण्यात आले असून संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत.
