जव्हारच्या ज्योती भोये यांची महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड

0
2256

प्रतिनिधी/जव्हार, दि. 25 : तालुक्यातील महिलांची चळवळ पुढे नेऊन तळागाळातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्या ज्योती भोये यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ज्योती भोये यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या मार्फत वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. यातून त्यांनी आदिवासी समाजातील विधवा आणि निराधार महिलांना नेहमी मदत केली आहे. भोये स्वत: आदिवासी समाजातील असल्याने त्यांना आदिवासी गोरगरीब महिलांच्या समस्या आणि अडचणींची जाण आहे. त्यामुळे त्यांची महिला आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याने महिलांमध्ये आनंद आहे.

भोये यांची महिला आयोग सदस्यपदी निवड झाल्याने पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, वाडा, डहाणू अशा सर्वच तालुक्यातील महिलांना न्याय मिळणार आहे.