एस. आर. करंदीकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन संपन्न

0
2136

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. १३ : येथील ज्ञानभारती सोसायटी संचलित एस. आर. करंदीकर महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या हस्ते संपन्न झाले. या इमारतीमध्ये प्रत्येकी १ हजार चौरस फूट क्षेत्राच्या ६ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

भरत राजपूत हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते जनरल सेक्रेटरी म्हणून देखील निवडून आले होते. आता त्यांना ज्ञानभारती सोसायटीने संचालक मंडळाचे सदस्य बनविले असून त्यांच्या नेतृत्वाखालील समिती विस्तारित इमारतीचे बांधकाम करणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र घागस, डॉ. रोमिओ मस्कारेन्हास, इकबाल धनानी, मिलिंद मावळे हे समितीचे अन्य सदस्य असून वास्तुविशारद म्हणून मकरंद करंदीकर जबाबदारी सांभाळणार आहेत.