लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या अध्यक्षपदी राजेश पारेख

0
1749

राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणू, दि. 23 जुलै : 2017-18 वर्षासाठी लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या अध्यक्षपदी राजेश पारेख यांची निवड करण्यात आली आहे. लॉयन्स क्लबचे पास्ट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गोविन्दजी सिघानिया यांनी त्यांना पदाची शपथ दिली. दशाश्री माळी समाज हॉल येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात राजेश पारेख व त्यांच्या सर्व टिमला सिंघानीया यांनी अतिशय रंजक पद्धतीने शपथ दिली. मावळते अध्यक्ष दिनेश रॉय यांच्याकडून पारेख यांनी सुत्रे स्विकारली. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Lionsलॉयन्स क्लबचे मावळते अध्यक्ष दिनेश रॉय यांनी यावेळी बोलताना लॉयन्स क्लब ऑफ डहाणूतर्फे वर्षभरात विविध प्रकारचे 132 प्रकल्प राबविल्याची माहिती दिली. याबद्दल उपस्थितांनी दिनेश रॉय व त्यांच्या टिमची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तर नवे अध्यक्ष राजेश पारेख यांनी त्यांचे दिवंगत पिता हसमुखलाल पारेख यांचे स्मरण करुन वडीलांनी आपल्यावर लॉयनीझमचे संस्कार केले असून आपण वडीलांच्या पावलांवर पाऊल ठेऊन पदाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन केले. पारेख यांनी वर्षभरात 365 उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली असून पारेख यांनी पदभार स्विकारताच त्याचवेळी 5 प्रकल्प संपन्न करुन आपल्या आगामी वाटचालीची चुणूक दाखवली.
क्लबच्या टिममध्ये उपाध्यक्षपदी जिग्नेश ठक्कर, मानद सचिवपदी हरदिपसिंग मारवा, सहसचिवपदी विवेक पुनतवार, खजिनदारपदी तेजस पोंदा तर सह खजिनदारपदी प्रशांत पारेख यांसह विलास सोरठी, मिलींद मावळे, राजू देशमुख, रमेश कर्णावट, नलिन पटेल, रमेश नहार, जयंती दोशी यांचा समावेश करण्यात आला आहे.