Sion MBBS 1995 Batch तर्फे जव्हार रुग्णालयाला वैद्यकीय सामुग्री भेट

0
2222

दि. 25: लोकमान्य टिळक वैद्यकिय महाविद्यालय आणि सायन हाॅस्पिटलचा 24 एप्रिल रोजी स्थापना दिवस असतो. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या 1995 च्या MBBS च्या माजी डॉक्टर विद्यार्थ्यांनी एकत्र येत निधी जमा केला. या बॅचमधील डाॅ. शशिकांत म्हशळ (सहयोगी प्राध्यापक के. इ. एम. हाॅस्पिटल), डाॅ. नितीन साटम (बालरोगतज्ञ, कांदिवली), डाॅ. सोनीश तेलंग (फॅमिली फिजिशियन, गोरेगाव) यांनी पुढाकार घेऊन, या निधीतून महत्वाचे परंतु सद्य परिस्थितीत महाग व सहज उपलब्ध न होणारे PPE KITS, N95 masks and Face shield इत्यादी जैव संरक्षक सामान विकत घेतले. आणि ते दुर्गम आदिवासी भागांत काम करणाऱ्या आपल्या डाॅक्टर बांधवांना कोरोनाची लागण होऊ नये व त्यांचे कार्य विनाखंडीत चालू रहावे या सामाजिक हेतूने भेट दिले. ही सर्व सामुग्री आज 25 एप्रिल, Foundation day चे औचित्य साधुन जव्हार, येथील उपजिल्हा रूग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून येथे अविरत काम करणारे डाॅ रामदास मराड, डॉक्टर भरत महाले, डॉक्टर संजय कावळे, डॉ. दिनकर पढेर, अन्य वैद्यकीय अधिकारी ,रुग्ण सेवक, परीचारक यांच्या सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता पाटील महाले देखील उपस्थित होत्या. “एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या पंक्तीप्रमाणे सायन 1995 बॕच मित्रपरिवाराने सामाजिक व वैद्यकीय बांधिलकीचे उत्तम उदाहरण उभे केले आहे.

माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV