पालघर, दि. 21: आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे अधिकार पोलिस उप विभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी दर्जाच्या अंमलदाराला नसल्याचे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे. या कायद्याच्या कलम 60 अन्वये राज्य शासनाला तक्रारी नोंदविण्यासाठी अधिकारी प्राधिकृत करावे लागतात. महाराष्ट्र शासनाने आता, दिनांक 17 एप्रिल च्या राजपत्रामध्ये अधिसू्चना प्रसिद्ध करुन, तक्रारी नोंदविण्यासाठी किमान उप विभागीय पोलिस अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी प्राधिकृत केले आहेत.
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वयेपोलिसांनी जिल्ह्यामध्ये हजारो गुन्हे दाखल केले असून बहुतेक प्रकरणी कॉन्स्टेबल किंवा हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. आतापर्यंत 3667 वाहने जप्त केली आहेत. या गुन्ह्यांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्वरुपाचे गुन्हे, दाखल करण्यात वरिष्ठ अधिकारी स्वारस्य दाखविण्याची शक्यता कमी असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट होणार आहे.