राजतंत्र मिडीया नेटवर्क
डहाणू दि. 11 : डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदावर भाजपचे गटनेते रोहिंग्टन झाईवाला यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्विकृत नगरसेवक पदावर भाजपचे शहर अध्यक्ष भरत शहा आणि विशाल नांदलस्कर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिहीर शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने निष्ठावान चेहरा असलेले रोहिंग्टन यांना गटनेता बनविल्यामुळे त्यांना उप नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल असे संकेत मिळत होते. भाजपला संपूर्ण बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उप नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली नाही. भाजपकडून स्विकृत सदस्यांसाठी भरत शहा यांचे नाव आधीच निश्चित होते. दुसर्या पदासाठी भाजपचे स्थान मजबूत करण्यात मोठा वाटा असणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र माच्छी यांना कडवी टक्कर देणारे विशाल नांदलस्कर यांचा विचार करुन भाजपने नगरपरिषदेत आक्रमक रणनीती आखण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे लयाला गेलेल्या पक्षामध्ये जान आणणारे नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीतील पराभूत उमेदवार मिहीर शहा यांचे पुनर्वसन करुन राष्ट्रवादी काँग्रेसने दूरगामी विचार केला आहे.
Home संग्राह्य बातम्या डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल नांदलस्कर...