पतंजलिचे योग शिक्षक प्रशिक्षण संपन्न

0
1806

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 15 : पतंजलि योग समिती (डहाणू) व लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्यातर्फे योगाचा प्रचार व प्रसार केला जातो आहे. विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील योगासनांचे धडे दिले जातात. या कार्यासाठी योगशिक्षक उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजीत केले जातात. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत डहाणूतील काँग्रेस भवन येथे अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. आज डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, उपाध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश पारेख, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, हेमंत पांचाळ, आयोजन सदस्य उत्तम सहाणे, भगवान पाटील, प्रभाकर जंगम, इंदिरा कुंतावाला यांसह अनेक योगप्रेमी उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात 44 सदस्य सहभागी झाले होते. विशेष प्राविण्य दाखविणार्‍या प्रशिक्षणार्थींना आणि कार्यकर्त्यांना यावेळी गौरवण्यात आले.