दि. 13 मे: (संजीव जोशी): इतके विषय पोलिसांवर कारवाईसाठी पुरेसे आहेत का? सर्व प्रश्न उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांचेसमोर मांडल्या आहेत. वरिष्ठांनी जर अट टाकली कि किमान 100 तक्रारी गोळा झाल्या तरच कारवाई करु, तर तशी तजवीज देखील ठेवली आहे. आता पालघर जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा सावरण्याची आवश्यकता असून पांघरूण घालण्याचे दिवस संपले आहेत.
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
डहाणू पोलिसांची तृतीयपंथीयांकडून खंडणी वसुलीची नामर्दानगी
1) 8 मे रोजी डहाणूचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेच्या आदेशाने सीमेवर तैनात सैनिकाच्या पत्नीला मारहाण झाली. ती डबलसीट स्कूटर चालवत होती. तीच्या समोर इतरांना 200 रुपये दंड वसूल करुन सोडण्यात आल्याने, मला पण दंड वसूल करुन सोडा, माझे पती सीमेवर तैनात असल्याने माझ्या लेकराबाळांच्या गरजांसाठी मला स्कूटर अत्यावश्यक आहे, अशी तिची मागणी होती. पोलिसांनी तीची स्कूटी जप्त केली. त्यानंतर मी, हस्तक्षेप केल्यानंतर स्कूटी बॉन्डवर सोडली आहे. येथे स्कूटी जप्त केल्याचा किंवा गुन्हा दाखल केल्याचा प्रश्न नाही, पोलिस कारवाईच्या बाबत दुजाभाव करतात व त्याबाबत महिलेला मारहाण करतात हे संतापजनक आहे.
2) 20 एप्रिल 2020 रोजी एका 64 वर्षीय माजी मुख्याध्यापक असलेल्या ज्येष्ठ महिलेला, तीच्या अपंग मुलासह बोलावण्यात आले. त्यांच्या सुनेने पोलिसांकडे तक्रार केली होती. अपंग मुलाने खोटे उत्पन्न व परदेशात जाण्याचे स्वप्न दाखवून लग्न केले व सासूचे कोणाशी तरीअनैतिक संबंध आहेत असे तक्रारीचे स्वरुप होते. ओमासेने सूनेसमोर व अपंग मुलासमोर महिलेला जबर मारहाण केली आणि जरब बसवली. मुलाला अजून मुलेबाळे का होत नाहीत, असा जाब विचारुन लवकर परिवार वाढवण्याची ताकीद दिली. पुन्हापुन्हा चौकशीच्या नावाखाली बोलावले. याबाबत महिलेने उप विभागीय अधिकारी मंदार धर्माधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत धर्माधिकारी यांना 8 मे रोजी विचारणा केली असता चौकशी चालू असल्याचे सांगितले. नेमकी काय व कशी चौकशी चालू आहे, याबाबत मात्र बोध झालेला नाही.
पोलिस स्टेशनसाठी लागणाऱ्या स्टेशनरी साठी हजारो रुपये वसूल केले:
जानेवारी महिन्यात ओमासेने अनेक लोकांकडून पोलिस स्टेशनच्या स्टेशनरीसाठी प्रत्येकी 20 हजार रुपयांची मागणी करुन पैसे उकळले. त्याने लॉयन्स क्लब, रोटरी क्लब सारख्या सेवाभावी संस्थांकडून देखील पैसे मागितल्याचे समजल्यावरुन मी स्वतः ओमासेंकडे गेलो आणि पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांच्या कारकिर्दीत स्टेशनरी साठी पैसे मिळत नाहीत का, असे विचारले. असे पैसे गोळा करणे योग्य नसल्याची भूमिका देखील मांडली. त्यांनी स्वतः, लॉयन्स क्लबच्या पदाधिकाऱ्याकडून 5 हजार व रोटरी क्लबच्या एका महिला पदाधिकाऱ्याकडून 10 हजार घेतल्याचे सांगितले व चूक मान्य करुन पैसे परत करणार असल्याचे सांगितले. मग मी स्वतः ओमासेने सांगितलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला. खातरजमा केली. डहाणू पोलिस स्टेशनमध्ये सैनिक पत्नीशी गैरवर्तन केल्यानंतर मी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार कानावर घातला. उप विभागीय अधिकारी यांनी दखल घेऊन विचारणा सुरु केल्याचे संकेत मिळाले. पुढील 24 तासांत 15 हजार साभार परत मिळाले. त्यातील एका साक्षीदाराला 11 मे रोजी धर्माधिकारी यांनी बोलावून घेतले व खातरजमा केली आहे. आता प्रतिक्षा आहे, वरिष्ठांच्या फैसल्याची.