वसई, दि. 08: वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांची रोजची वाढती आकडेवारी लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने विरार वसई महानगरपालिकेसाठी पूर्णवेळ आयुक्त दिला आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी श्री गंगाधरन डी. (आय. ए. एस.) यांची नवे आयुक्त म्हणून बदली केली आहे. सध्या पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार आहे. महानगर क्षेत्रामध्ये आतापर्यंत 22 रुग्णांचे घश्याचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA