दि. 5 डिसेंबर: डहाणू तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज घोलवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामपूर येथे राजेंद्र अढिया यांच्या मालमत्तेतून जाणारा रस्ता खूला केला आहे. येथील जितेस धोडी यांच्या शेताकडे व ग्रामदेवस्थानाकडे जाणारा रस्ता अढिया यांनी मागील 3 वर्षांपासून बंद केला होता असा जितेसचा आरोप आहे. आज माकपाचे नेते चंद्रकांत घोरखना यांच्या नेतृत्वाखाली धनेश आकरे, लता घोरखना, भरत कान्हात, राजेश दळवी यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जागेवर जाऊन अढिया यांनी घातलेले कुंपण व फाटक उखडून टाकले व जितेसचा मार्ग मोकळा केला. सर्वांनी ग्रामदेवाचे दर्शन घेतले व स्वतः पोलीसांकडे जाऊन जेलभरो आंदोलन केले. माकप कार्यकर्त्यांच्या या कृतीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सर्व आंदोलन कर्त्यांवर अटकेची कारवाई न करता या प्रकरणी तहसिलदार कार्यालयामार्फत न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन दिले आहे. मागील 3 वर्षांपासून याबाबत पोलिसांकडे तक्रारी अर्ज प्रलंबीत होता. मात्र त्याबाबत फारसे काही झाले नव्हते.
चला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ बनू या!
दैनिक राजतंत्रची योजना आहे …. ‘गाव तेथे Social Reporter‘ … ही योजना समजून घेण्यासाठी पुढील Link ला भेट द्या! – https://mahanews.com/?p=15559
तुम्हाला जर Social Reporter ONLINE Workshop विषयी माहिती हवी असेल तर खालील Link ला भेट द्या! –
https://mahanews.com/?p=15553
Social Reporter Online Workshop साठी रुपये 650/- शुल्क भरण्यासाठी पुढील Link चा वापर करा! … https://www.instamojo.com/@mahanews/l25d165af40e441629496cf2f43dbd8c6/