बोईसर, दि. 25 : पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर पालघर जिल्हाधिकार्यांमार्फत जनसमुह जमा होत असलेल्या सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या बोईसर येथे शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोईसर ग्रामपंचायतीमार्फत एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता 1860 चे कलम 188 (ब) तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, बोईसर परिसरात विनामास्क वावरणार्या नागरीकांकडुन 200 रुपयांचा दंड आकरला जाणार असल्याचेही सदर पत्रकात म्हटले आहे.