पालघर, दि. 25 : राज्यभरात करोनाचे रुग्ण वाढत असताना व नागरीकांना पुन्हा लॉकडाऊनची भिती सतावत असताना पालघर जिल्ह्यातही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 3 दिवसात पालघर जिल्ह्यात 38 रुग्णांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात मुख्यत्वे पालघर आणि डहाणू तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, 23 फेबु्रवारी रोजी जिल्ह्यात 25 नवे करोना रुग्ण आढळले. विशेष म्हणजे डहाणू (10) व पालघर तालुक्यात (15) हे नवे रुग्ण आढळून आले. तर 24 फेबु्रवारीच्या आकडेवारीनुसार, डहाणूत 3, पालघर 3 व वाडा तालुक्यात 1 असे 7 रुग्ण आढळून आले. आज 25 फेबु्रवारी रोजी आणखी 6 नव्या करोना रुग्णांची यात भर पडली असुन आज डहाणूत 1, पालघरमध्ये 4 व वाडा तालुक्यात 1 असे एकुण 6 रुग्ण आढळून आले आहेत.