डहाणू दि. 25 ऑक्टोबर: डहाणूचे नगरसेवक तथा डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री भावेश वृजलाल देसाई यांच्या मातोश्री चंपाबेन वृजलाल देसाई यांचे 23 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पुत्र भावेश व विवाहित कन्या सरोज व्होरा, शोभा मोदी, जयश्री कसानी, हिना दोषी, स्नुषा/ जावई/ नातवंडे असा परिवार आहे.
सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी प्रार्थना सभा
दिवंगत चंपाबेन यांची प्रार्थना सभा सोमवार, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी दशाश्री वाणिक समाज वाडी (मसोली) येथे दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान आयोजीत करण्यात आल्याचे देसाई परिवाराकडून कळविण्यात आले आहे.