बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्यांना सरसकट इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईनची आवश्यकता नाही! – शासनाचा सुधारित आदेश

0
2019

mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV(तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या नागरिकांना सरसकट इन्स्टीट्यूशनल (संस्थात्मक) कॉरन्टाईन करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करणारे सुधारित आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 18 मे रोजी जिल्हाधिकारी यांनी, बाहेरून आलेल्या लोकांना इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईन करण्याचे आदेश काढले होते. बाहेरून आलेल्या लोकांसाठी नगरपालिका व ग्रामपंचायतीना व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. शाळांमधून अशा लोकांची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र आज सुधारित आदेश काढण्यात आले असून, त्यानुसार ज्या लोकांकडे होम क्वारन्टाईन साठी घरात स्वतंत्र खोली असेल त्यांना होम क्वारन्टाईन करावे व ज्यांच्याकडे अशी व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईनची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे वाचा :- बाहेरुन आलेल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सरपंच व नगरसेवकांच्या समित्या

हे वाचा :- लॉकडाऊन: 22 मे पासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू आता फक्त दोन झोन मध्ये विभागणी!
रेड झोनमध्ये व प्रतिबंधीत क्षेत्रात निर्बंध, अन्यत्र निर्बंध शिथील