राजतंत्र न्यूज नेटवर्क
डहाणू दि. 26 : काही दिवसांपूर्वीच डहाणूच्या समुद्र किनार्या नजिक बोट उलटून झालेल्या अपघातात बचावकार्य करणार्या 145 जणांचा राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विष्णू सवरा यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आनंद ठाकूर, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत उपस्थित होते. डहाणू तालुका विकास परिषदेसह पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, डहाणू एज्युकेशन ट्रस्ट, इंडियन मेडीकल असोसिएशन, डहाणू इंडस्ट्रीज असोसिएशन, लॉयन्स क्लब ऑफ डहाणू, डहाणू तालुका ज्वेलर्स असोसिएशन, जैन सोशल गृप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर होते. सर्व गौरव विरांना यावेळी आयोजकांतर्फे तसेच पोलीस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरव विरांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी असलेला शापूर सालकर सह उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांचा देखील समावेश होता.
13 जानेवारी रोजी येथील समुद्र किनार्याच्या जवळच असलेल्या बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्ग सुटल्यानंतर समुद्रात फेरी मारणार्या बोटीतून समुद्र सफारी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात 1 किलोमीटर अंतराच्या जवळपास बोट गेली असता उलटली. हा प्रकार काही लोकांच्या नजरेसमोर घडला. त्यातील एक प्रसिद्ध छायाचित्रकार सनत तन्ना हे तिथे उपस्थित होते. बोट उलटल्याचे दिसताच त्यांनी फेसबुकवर लगेचच या दुर्घटनेबाबत पोस्ट टाकून मदतीचे आव्हान केले. अनेकांना मोबाईलवरुन हे वृत्त कळवले. ही बातमी समजताच डहाणूतील लोकांनी मोठ्या संख्येने समुद्र किनार्यावर धाव घेतली. काही जण समुद्रात जवळपास मासेमारी करीत होते, काही जण मच्छीमारीच्या होड्या, नौका घेऊन घटनास्थळी पोहोचले. काहींनी समुद्रात उड्या मारुन पोहून घटनास्थळ गाठले. सर्वांनी जीवाची बाजी लावून जवळपास 27 जणांना वाचविले. 3 दुर्दैवी विद्यार्थीनींना आपण वाचवू शकलो नाही. या दुर्घटनेत डहाणूच्या नागरिकांनी जे एकता, कर्तव्य आणि संयमाचे प्रदर्शन केले ते अनमोल ठरले. संबंधित शासकीय यंत्रणांनी देखील चोख जबाबदारी पार पाडली. डहाणू तालुका विकास परिषदेतर्फे प्रजासत्ताक दिनांच्या सायंकाळी अशा 145 दिलदार नागरिकांचा जाहीर नागरी सत्कार घडवून आणण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दुर्घटनेत बळी पडलेल्या 3 विद्यार्थीनींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यानंतर डहाणू तालुका विकास परिषदेचे निमंत्रक तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात डहाणू तालुका विकास परिषदेची संकल्पना स्पष्ट करुन कार्यक्रमाचा हेतू विषद केला. यानंतर व्यासपीठावरील ना. सवरा, सह आयोजक असलेल्या इंडियन मेडीकल असोसिएशनचे डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक कांबळे, डहाणू इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतिष पारेख, डहाणू तालुका ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष शंकरसिंह राजपूत, लॉयन्स क्लब ऑफ डहाणूचे माजी अध्यक्ष रविंद्र राऊत, जैन सोशल गृपचे अध्यक्ष शैलेश राकामुथा, उपस्थित आमदार व नगराध्यक्ष, डहाणूचे उप विभागीय अधिकारी सचिन पांडकर, डहाणूचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश करंदीकर या सर्व मान्यवरांचे डहाणू तालुका विकास परिषदेच्या सदस्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ना. सवरा यांनी डहाणूवासीयांनी दुर्घटना घडल्यानंतर ज्या तत्परतेने मदतकार्य केले आणि यातून अनेकांचे प्राण वाचविले, साहस, एकता, संयम आणि कर्तव्यबुद्धी दाखवली ती खूपच कौतुकास्पद असल्याचे सांगून असा गौरव सोहळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे देखील कौतुक केले. अशा कार्यक्रमातून इतरांना प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात अॅड. प्रकाश करंदीकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे पाठ्यक्रमात देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. या गौरव सोहळ्यात 145 जणांचा सत्कार होणार असल्याने वेळेचे नियोजन करण्यासाठी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनी केवळ ना. सवरा हेच विचार मांडतील अशी भूमिका घेतली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सत्कार मूर्तींची नावे
डहाणू सती पाडा
1) सुधीर आक्रे
2) विठ्ठल यशवंत लाखात
3) राहुल जवाहरसिंह ठाकूर
4) सुरज यशवंत लाखात
5) भावेश विश्वास घाटाळ
6) संजू रमेश इभाड
7) सन्नी संजय बेडगा
8) अमोल बाबू अंभिरे
9) मनिष चंद्रकांत सालकर
10) गणेश सुकर सालकर
11) हेमंत सुकर सालकर
12) किरण अमित विलात
13) शैलेश संजय वेडगा
14) अरुण गणपत आंबात
15) आनंद गणपत दिवेकर
डहाणू गाव
1) चंदन विलास मेहेर
2) प्रकाश दवणे
3) गणेश धानिवरे
4) बबलू मेहेर
5) हेमंत अंभिरे
6) संदीप मर्दे
7) हरेश्वर आक्रे
8) गौरव मर्दे
9) राकेश पागधरे
10) रुपेश मर्दे
11) सागर अंभिरे
12) हेमंत आक्रे
13) प्रयाग केणी
14) पिंटू आक्रे
15) जयदेव पागधरे
16) कामेश मेहेर
17) प्रदीप दवणे
18) गणेश धानिवरे
19) विपूल दवणे
20) अशोक दवणे
21) स्वमनाथ धानिवरे
22) प्राचीन धानिवरे
23) यशेस दवणे
24) रौनक दवणे
25) बोटू मर्दे
26) जयेश मांगेला
27) वैभव पागधरे
28) मागेश तांडेल
29) वसंत मर्दे
30) महेंद्र मेहेर
31) संतोष दवणे
32) हितेश धारणे
33) दीपक प्रभू
34) संतोष धानमेहेर
35) तेजस मर्दे
36) देवेंद्र दवणे
37) हितेश राठोड
38) राहुल दवणे
39) नितीन मांगेला
40) साई पागधरे
41) कमलेश अक्रे
42) नयन शिंदे
43) पवन धानमेहेर
44) योगेश पागधरे
45) जतिन शिंदे
46) श्री गणेश श्रीप्रकाश बारी
धाकटी डहाणू
1) नंदकुमार सुखदेव विंदे
12) जयकिशन हरेश्वर तामोरे
3) सुमित भरत पागधरे
4) रोशन चंद्रकांत विंदे
5) तुषार अरविंद मर्दे
6) गणेश हरिश्चंद्र अक्रे
7) यशवंत दत्तात्रय तांडेल
8) आनंद अशोक अंभिरे
9) राकेश लक्ष्मण मर्दे
10) जतिन अशोक मर्दे
11) मधुकर तरे
12) चेतन आत्माराम अंभिरे
13) अमन हिरालाल हरिजन
डहाणू आगर
1) नटवर हरी माच्छी
2) किरण अनंत माच्छी
3) जिग्नेश डाकोरीया
4) कृपेश सुरेश तांडेल
5) अविनाश डी. माच्छी
6) जयेंद्र माच्छी
7) सुरेश जगन्नाथ माच्छी
8) ईश्वर नारायण माच्छी
9) जगदीश विठ्ठल पटेल
10) जतीन अनंत माच्छी
11) भरत गोपाळ माच्छी
12) कांतीलाल डाया माच्छी
13) दीपक नारायण पटेल
14) वैभव बलसारा
15) दिनेश कानजी माच्छी
16) विनोद दाजी माच्छी
17) कन्हैया दामोदर माच्छी
18) हरिश्चंद्र डाया माच्छी
19) जितेंद्र मोहन माच्छी
20) दीपेश पुरुषोत्तम माच्छी
21) रिवेन राजेश पाटील
22) गणेश सोमा माच्छी
23) गणेश विष्णू तुंबडे
24) दिनेश दाजी तांडेल
नरपड
1) दीपक विठ्ठल मर्दे
2) दिलीप हरिश्चंद्र अंभिरे
3) लक्ष्मण वि. मर्दे
4) राजेश पांडुरंग मर्दे
5) देवेंद्र हरिश्चंद्र अंभिरे
6) हर्षद शरद किणी
7) जोशील दीपक मर्दे
8) जिग्नेश राजेश मर्दे
9) मंगेश रमेश अंभिरे
10) तृषार राजेश मर्दे
11) हरिश्चंद्र गणपत अंभिरे
12) जयेश हरिश्चंद्र अंभिरे
13) जतिन जितेंद्र मेहेर
14) सागर सहदेव धनु
15) केतन महेश मर्दे
16) कृणाल चंद्रकांत धनु
17) विलास शांताराम धानमेहेर
18) अतिश विलास धानमेहेर
19) योगेश भरत मर्दे
बोटीत असलेले व बचतकार्य करणारे पोंदाचे विद्यार्थी
1) दाजी पांडू तांडेल
2) प्रथमेश रमेश पवार
3) हिसामुद्दिन खान
विशेष बचावकार्य करणारा युवक
शापूर सालकर
विशेष कामगिरी करणारे
1) सनत तन्ना
2) कुमारी श्वेता सुधीर अक्रे
विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी
1) मा. सचिन पांडकर, पोलीस उप अधिक्षक
2) श्री. सुरेश दुसाने, पोलीस नाईक
3) श्री. हेमंत पांडूरंग पराडकर, पोलीस उप निरिक्षक
4) श्री. दिपक मर्दे, पोलीस हवालदार
5) श्री. बी. एच. मांगेला
6) श्री. एम. पी माने, पो. कॉन्स्टेबल
7) श्री. ए. आर. आरते, पो. कॉन्स्टेबल
8) श्री. वाय. एस. बळीगडे, पो. कॉन्स्टेबल
9) श्री. प्रकाश सैतावडेकर, स्पिड बोटीचा खासगी चालक
10) श्री. नारायण पाटील, स्पिड बोटीचा खासगी चालक
11) श्री. ए. व्ही. खरपडे, पो. कॉन्स्टेबल
12) श्री. व्ही. के. बारी, पो. कॉन्स्टेबल
13) श्री. राहूल कांबळे, पोलीस उप निरिक्षक
14) श्री. कुमार आवटे, सहाय्यक फौजदार
15) श्री. विनायक मर्दे, पोलीस हवालदार
16) श्री. मनिष नाकील, पो. कॉन्स्टेबल
टिम डहाणू तालुका विकास परिषद कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक असलेल्या डहाणू तालुका विकास परिषदेचे निमंत्रक सदस्य
1) संजीव जोशी
2) सुधीर कामत
3) राजकुमार नागशेट
4) जितेन संघवी
5) विवेक करकेरा
6) सतिश पारेख
7) दीपक कास्टीया
8) विनोद स्वामी
9) विपूल गाला
10) प्रशांत सोनी
11) आनंद बाफना
12) धवल पटेल
13) फैय्याझ खान
14) रोमियो मस्कारेन्हास
15) रतन खत्री