डहाणू / तलासरी: आज स. 11.39 वाजता व काल दु. 4.16 वाजता भूकंपाचे धक्के

0
2025

डहाणू (दि. 15.09.2020): डहाणू व तलासरी तालुक्याला आज सकाळी 11.39 वाजता 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. काल (सोमवारी) देखील दुपारी 4.16 वाजता 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. 11 सप्टेंबर रोजी भूकंपाचे सलग 6 धक्के बसल्यानंतर 2 दिवस शांततेत गेले होते. 11 सप्टेंबरच्या धक्क्यांमध्ये 3.5 व 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांचा समावेश होता.