
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर नगर मध्ये नेहमीच उत्साहात साजरी केली जाते. मात्र या वर्षी प्रथमच या निमीत्ताने भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान आयोजीत केले असून यातून मागासवर्गीय समाजाला संविधानाने दिलेले अधिकार समजावेत हा उद्देश आहे. लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, तथा माजी नगरसेवक नगिन देवा यांनी केले आहे.