डहाणू, दि. 17 : तालुक्यातील वाणगाव येथील एका फटाका कारखान्याला आज सकाळच्या सुमारास आग लागून भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील डेहणे-पले स्थित विशाल फायरवर्क्स ही कंपनी असुन सकाळी 10 च्या सुमारास या कारखान्याला आग लागली व भीषण स्फोट झाला. या घटनेत 10 लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. आग इतकी भीषण होती की 15 ते 20 किलोमीटर अंतरावरुन आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. स्फोटानंतर घटनास्थळपासुन काही किलोमीटरच्या परिसरात हादरे जाणवल्याने हे भूकंपाचे धक्के असल्याचा नागरीकांचा समज झाला होता. मात्र काही वेळातच आगीची बातमी समोर आल्याने भूकंपाच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला. दरम्यान, डहाणू व तारापूर औद्योगिक परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.