एमआयडीसीतील कॅम्लिन फाईन कंपनीला आग

0
1938

MIDC AAGवार्ताहर/बोईसर, दि. 24 : तारापूर औद्योगिक वसाहतीतील कॅम्लिन फाईन (प्लॉट नं.डि 2/3) या कंपनीला आज सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले.

कॅम्लिन फाईन कंपनीतील डिस्टिलेशन कॉलम भागात अचानक ही आग लागली होती. आग लागल्याची घटना समजताच अग्निशामन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचा काही भाग जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसून पोलीस आग लागल्याच्या कारणांचा तपास करत आहेत.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!