राजतंत्र न्यु नेटवर्क
पालघर, दि. ९ : शिवसेनेतर्फे काल, मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र हे शक्तिप्रदर्शन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भोवले असून जिल्ह्याधिकाऱ्यानी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी फोजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) (३) अन्व्ये नव्हती येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून १०० मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू असलेल्या हद्दीत प्रवेश करून घोषणाबाजी केल्याने सहाय्य्क निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत लेखी आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित कार्यकर्त्याविरोधात सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.