पालघर, दि. 8 : पालघर जिल्हाधिकार्यांनी काही दिवसांपुर्वीच करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालघर तालुक्यातील आठवडा बाजारांवर बंदी घालण्याचा व आठवडाभरातच ही बंदी उठविण्याचा आदेश पारित केला होता. व्यवसाय, रोजगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याने आठवडा बाजारांवरील बंदी उठवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी आपल्या आदेशात म्हटले होते. मात्र जिल्ह्यातील करोना रुग्णांचा संख्या वाढतच असल्याचे उपाययोजनांचा भाग म्हणून आता जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार्या यात्रा, उत्सव, बोहाडा व उरुसवर आज, 8 मार्चपासुन पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असुन जिल्ह्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.