…म्हणून बोईसरच्या स्ट्रीटलाईट्स आहेत बंद!

0
3575
संग्रहित छायाचित्र

बोईसर, दि. 1 : मागील काही दिवसांपासुन बोईसर शहरातील स्ट्रीटलाईट्स (पथदिवे) बंद असल्याने संध्याकाळनंतर संपुर्ण शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरातील दुकाने रात्री 8 नंतर बंद करण्याचे आदेश असल्याने अंधार व तुरळक लोकांमुळे रस्त्यांवर सन्नाटा असुन काही भागात एकट्याने प्रवास करण्यासही नागरीक धजावत आहेत. अनेक नागरीक तर करोना उपाययोजनांचा भाग म्हणून प्रशासन जाणूनबुजून स्ट्रीटलाईट्स बंद तर ठेवत नसतील ना? अशी शंकाही व्यक्त करीत आहेत. त्यामुळे यामागील कारण शोधण्याचे प्रयत्न केले असता याला केवळ थकीत वीजबिल कारण असल्याचे समजले आहे. पथदिव्यांचे वीजबिल अदा करणे पंचायत समितीच्या अखत्यारीत असुन या भागातील कोट्यावधींचे वीजबिल थकले असल्याची माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे (थकीत रक्कमेबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही). त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडीत केला असुन शहरातील रस्ते अंधारात आहे. दरम्यान, थकीत विजबिलाबाबत सध्या पंचायत समिती सदस्य व महावितरणच्या अधिकार्‍यांमध्ये बैठक सुरु असुन यावर तोगडा काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या बैठकीत आता काय निर्णय होतो याकडे नागरीकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.