डहाणू नगरपरिषदेतर्फे दिव्यांगांना आर्थिक मदत

0
3316

डहाणू दि. 17 नोव्हेंबर: डहाणू नगरपरिषदेतर्फे 199 दिव्यांगांना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्याहस्ते प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करण्यात आली. दशाश्री माळी वणिक समाज सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार, आरोग्य अथवा शैक्षणिक कारणांसाठी ही मदत दिली जाते.