राहुल गांधींवर गुन्हा दाखल करा! संजीव जोशी यांची पोलीसांकडे तक्रार

0
2077

राजतंत्र न्यूज नेटवर्क
दि. २४: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ चे कलम ७४ अन्वये कारवाई करावी अशी लेखी तक्रार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू पोलीसांकडे केली आहे. पोलीस याप्रकरणी काय भूमिका घेतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी खासगी विहिरीत पोहोण्यास गेल्याच्या कारणाने ३ अनुसूचित जातीच्या मुलांना नग्नावस्थेत मारहाण करण्यात आली होती. ह्या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावरुन प्रसारित करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी Twitter या सोशल मिडीयावरुन ह्या प्रकरणाला जातीय रंग देत आक्षेपार्ह व्हिडिओ जसाच्या तसा पोस्ट केला होता. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ च्या कलम ७४ प्रमाणे पिडीत महिला आणि अल्पवयीन मुले यांची ओळख होईल असा मजकूर किंवा छायाचित्र प्रसारित करण्यास बंदी आहे. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडीयाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे देखील अशी पिडीत महिला व बालकांची ओळख उघड करण्यास मनाई आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्ट द्वारे जामनेर तालुक्यातील दुर्घटनेत ३ अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलांना विवस्त्र करुन अमानुषपणे मारहाण केल्याच्या दुष्कृत्याचे व्हिडिओ चित्रण प्रसारित केले. लोकांच्या भावना भडकावण्यासाठी आणि जाती जातींमध्ये विद्वेश पसरवून दंगली भडकविणे व त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या दृष्ट विचारांनी प्रेरीत होऊन राहुल यांनी हे कृत्य केलेले असल्याचा आरोप जोशी यांनी आपल्या  तक्रारीमध्ये केला आहे.
19875213_10208667664080858_9151455589993352770_nराहुल गांधी यांच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ चे कलम ७४ प्रमाणे, माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम 66 अ आणि ६७ प्रमाणे, भारतीय दंड विधान संहीतेच्या कलम १५३ अ, २९५ अ, २९८ व 504 प्रमाणे आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ च्या कलम ३ (क) प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
” राहुल गांधी हे खासदार आहेत. संसद हे कायदेमंडळ आहे. कायदेमंडळाच्या सदस्याला स्वतः तयार केलेले कायदे समजून घेतले पाहिजेत. राहुल यांनी प्रथमदर्शनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचे स्पष्ट झालेले असताना शासनाने किंवा अन्य सक्षम यंत्रणेने त्यांच्यावर आजपर्यंत
फौजदारी गुन्हा दाखल केलेला नसल्याने मी तक्रार करण्याचा निर्णय घेतला! “
– संजीव जोशी