बोईसर एम आय डी सी दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांना अटक

0
2000
बोईसर वर्ताहर
   तारापूर एम आय डी सी मधील नोवाफेन स्पेशॅलिटीज प्रा .लि. या रासायनिक कारखान्यामध्ये  झालेला भीषण स्फोट व आगीच्या  दुर्घटनेत चार जणांचा झालेला मृत्यू व 14  जखमी झाल्या प्रकरणा वरून कारखान्याचे मालकासह व्यवस्थापक व 2 ऑपरेटर वर   बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना आज अटक करून न्यायालयात हजर केले असता 15 दिवसाची म्याजिस्टेट कस्टडी देण्यात आली आहे
       गुरुवारी दि 8रात्री 11.28 च्या सुमारास प्रथम जेव्हा  भीषण स्फोट झाला तेव्हा घटनास्थळा पासून सुमारे 25 कि मी अंतरा पर्यंत हादरा बसला होता तर या आगी मध्ये नोवाफेन स्पेशॅलिटीज प्रा .लि. या रासायनिक कारखान्या सह शेजारचे पाच कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते तर अन्य दहा कारखान्याचे स्फोटाच्या हादऱ्याने प्रचंड नुकसान झाले आहे
       बोईसर पोलिसांनी या प्रकरणी कारखान्याचे मालक सरल शहा (34) ,व्यवस्थापक हेमराज परतने (49),ऑपरेटर न्यानदिप म्हात्रे (31)व राजू रावते (30) या चार जणांवर निष्काळजी पणा ,एखाद्या व्यक्तीच्या मृत्युस कारणीभूत ,यंत्र सामग्री व रासायनिक पदार्थांची हयगय पणे  हाताळणी इत्यादी च्या 304 अ ,337 , 338 , 285 , 286 ,287 , 427 व 34 या कलमानुसार सोमवारी (दि 12) रात्री उशिरा  गुन्हा दाखल करुन आज अटक करण्यात आली
      या दुर्घटनेत शेजारच्या आरती ड्रग या रासायनिक कारखान्यातिल जानू अगरिया (23) ,पिंटू गौतम (24) व अलोकनाथ अगरिया (25 ) या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर प्राची फार्मास्युटीकल या कारखान्यातील गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा राक्षकांचा मृत्यू सोमवार दि 12रोजी गुजरात च्या रुग्णालयात झाला असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून अन्य 14 जखमी झाले होते त्या पैकी काही जणांना उपचारा नंतर सोडले असले तरी काही जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत .